Dhananjay Munde & Ambadas Danvesakal
मराठवाडा
Dhananjay Munde : ‘सरपंचाच्या खुनाचे प्रकरण; फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे’
Ambadas Danve : संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जावे आणि सर्व आरोपींना कठोर शासन व्हावे, असे आमदार धनंजय मुंडे यांनी मत व्यक्त केले.
बीड : मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या स्वरूपाची गुन्हेगारी समाजविघातक असून अशा वृत्तीला वेळीच ठेचले गेले पाहिजे. या प्रकरणातील सर्वच्या सर्व आरोपींना कठोर शासन केले जावे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जावे, असे मत आमदार धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

