
Walmik Karad: संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयात पार पडली. मात्र सोमवारी झालेल्या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम अनुपस्थित राहिले. सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी काम पाहिलं. महत्त्वाचे म्हणजे विष्णू चाटेच्या वकिलांनी दोषमुक्तीच्या अर्ज मागे घेतला आहे. तर वाल्मिक कराडच्या वकिलांनी पुन्हा एकदा इलेक्ट्रॉनिक पुराव्यांची मागणी सरकारी पक्षाकडे केली आहे.