
मस्साजोग : येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद गुरुवारी, दुसऱ्या दिवशीही विधानसभेत उमटले. आमदार संदीप क्षीरसागर यांना या हत्येचा घटनाक्रम सांगताना अश्रू अनावर झाले. मस्साजोग व परभणी येथील तरुणाच्या मृत्यूच्या घटनांची चौकशी विशेष चौकशी पथकामार्फत (एसआयटी) करावी, अशी मागणी सर्वपक्षीय आमदारांनी केली. या चर्चेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी काय उत्तर देतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.