Namdev Shastrisakal
मराठवाडा
Namdev Shastri : जलदगती न्यायालयात चालवावा खटला : महंत डॉ. नामदेव शास्त्री
Santosh Deshmukh Case : भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी केली. दोषींना कठोर शिक्षा व्हावी, असे ते म्हणाले.
बीड : ‘अगोदर मला घटनेची तीव्रता माहीत नव्हती. त्यामुळे पहिल्या दिवशीचे वक्तव्य अजाणतेपणामुळे झाले. संतोष देशमुख कुटुंब माझ्याकडे आले, तेव्हा त्यांनी मला जाणीव करून दिली. त्यातून किती भयंकर क्रौर्य आहे, हे समोर आले.