
Santosh Deshmukh Murder Case: मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या, अवादा कंपनीकडे खंडणीची मागणी, अॅट्रॉसिटी या गुन्ह्यांतून दोषमुक्तीसाठी वाल्मीक कराडने केलेला अर्ज विशेष मकोका न्यायालयाने मंगळवारी (ता. २२) फेटाळला. विशेष मकोका न्यायाधीश व्यंकटेश पटवदकर यांनी हा निर्णय दिला. जप्त मालमत्ता मोकळी करावी हा आरोपी पक्षाचा, तर त्याच्या उर्वरित मालमत्ता जप्तीचा सरकार पक्षाच्या अर्जावरील निकाल न्यायालयाने राखून ठेवला आहे. पुढील सुनावणी चार ऑगस्टला होणार आहे.