हिंगोली तालुक्यातील आठ फेब्रुवारीपासून सरपंच, उपसरपंच निवड प्रक्रिया

राजेश दारव्हेकर
Tuesday, 2 February 2021

सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडीसाठी सोमवार ( ता. आठ) फेब्रुवारीपासून सभा बोलावण्यात आली असून २५ अधिकार्‍यांच्या नेमणुकाही करण्यात आल्या आहेत.

हिंगोली : तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सरपंच पदाचे आरक्षण जाहिर करण्यात आले. त्यानंतर आता सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडीसाठी सोमवार ( ता. आठ) फेब्रुवारीपासून सभा बोलावण्यात आली असून २५ अधिकार्‍यांच्या नेमणुकाही करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी एक फेब्रुवारीला निर्देश दिले आहेत.

हिंगोली तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका शांततेत पार पडल्या. निवडणुकीआधी सरपंच पदासाठीचे जाहीर करण्यात आलेले आरक्षण रद्द करून मतदान प्रक्रिया झाल्यानंतर सरपंच पदासाठी आरक्षण सोडत झाली. यामध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे आरक्षण पुर्वी जाहीर झाल्याप्रमाणे कायम ठेवण्यात आले. त्यानंतर आता सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडीसाठी सभा घेण्यात येणार असून, त्यासाठी अध्यासी अधिकार्‍यांच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत. तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी ता. ८, १०, १२ व  १५ फेब्रुवारीला सभा बोलाविण्यात येणार आहेत. या सभेत सरपंच व उपसरपंचाची निवड करण्यात येणार असून, ही प्रक्रिया अध्यासी अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

दरम्यान, आठ फेब्रुवारीला पळसोना, डिग्रसवाणी, कण्हेरगाव, भिंगी, लिंबाळा, हिंगणी, कळमकोंडा ( बु ), डिग्रस कऱ्हाळे, येळी, उमरा, खंबाळा, अंधारवाडी, पिंपळदरी, पहेनी, गिलोरी, फाळेगाव, सागद, नरसी नामदेव, बोराळवाडी, जोडतळा, खेरडा, भांडेगाव, जयपूरवाडी, भिरडा, पिंपळखुंटा या २५ गावाचा समावेश आहे.

तर १० फेब्रुवारीला सावरगाव, लिंबी, कानडखेडा बुद्रुक, चिंचाळा, वांझोळा, खेड, हिवराबेल, दाटेगाव, पारडा, कडती, खरबी, कारवाडी, बोरजा, खडकद बुद्रुक, राहोली बुद्रुक, बोराळा, पातोंडा, वैजापूर, सिरसम बुद्रुक, राजुरा, साटंबा, बोडखी, बासंबा, पारोळा या २५ गावांचा समावेश आहे.

तसेच बारा फेब्रुवारीला दुर्गसावंगी, लोहरा, कानडखेडा खुर्द, बेलुरा, दुर्गधामनी, माळधामणी, खानापूर चित्ता, कारंजाळा, बोरी शिकारी, आमला, इंचा, पिंपरखेड, वसई, जांभरुनआंध, वरुडगवळी, देवठाणा, अंभेरी, सरकळी, पांगरी, पेडगाव, कनका, नवलगव्हाण, माळसेलू, माळहिवरा, लोहगाव या २४ गावाचा समावेश आहे.

याशिवाय पंधरा फेब्रुवारीला हिरडी, कलगाव, भोगाव, जामठीखुर्द, इसापुर, देऊळगाव चिंचोली, बोनडाळा, केसापुर, जांभरुन तांडा, गाडीबोरी, सावरखेडा, नांदुरा, बळसोंड, टाकळीतर्फे नांदापुर लासिना, समगा, खंडाळा, सवड, उमरखोजा या वीस गावांचा समावेश आहे. अशा एकूण तालुक्यातील ९४ ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडीसाठी सकाळी १० ते १२ यावेळेत नामनिर्देशनपत्र स्विकारली जातील. तर दोन वाजता सभेला सुरुवात होणार आहे. दरम्यान, सरपंच पद मिळावे यासाठी इच्छुकांकडून सदस्यांची मनधरणी सुरु असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे
                        .


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sarpanch, Deputy Sarpanch selection process from February 8 in Hingoli taluka