- अनिल गाभुड
विहामांडवा - पैठण तालुक्यातील आवडे उंचेगाव येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती ज्योती सतीश आंधळे यांची यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी संस्थेद्वारे त्रिपुरा राज्याचा पंचायत राज व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी ता. २९ डिसेंबर २०२४ ते ता. ४ जानेवारी २०२५ दरम्यान अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे.