esakal | सेनगाव तालुक्यातील सरपंच आरक्षण जाहिर, ५३ ग्रामपंचायतीवर महिलाराज
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

सेनगाव तालुक्यातील १०७ ग्रामपंचायतीसाठी ता.२८ गुरुवारी तहसील कार्यालयामध्ये निवडणुक अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच आरक्षण सोडत जाहिर करण्यात आल्या आहेत.

सेनगाव तालुक्यातील सरपंच आरक्षण जाहिर, ५३ ग्रामपंचायतीवर महिलाराज

sakal_logo
By
विठ्ठल देशमुख

सेनगाव ( जिल्हा हिंगोली ) : तालुक्यातील १०७ ग्रामपंचायतीचे सरपंच आरक्षण सोडत गुरुवारी (ता. २८)  जाहिर करण्यात आली आहे. यामध्ये तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतीसाठी महिलांना तर ५४ जागांसाठी सर्वसाधारणसाठी आरक्षण सोडण्यात आहे.

सेनगाव तालुक्यातील १०७ ग्रामपंचायतीसाठी ता.२८ गुरुवारी तहसील कार्यालयामध्ये निवडणुक अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच आरक्षण सोडत जाहिर करण्यात आल्या आहेत. यामध्ये तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतवर महिला राज तर ५४ ग्रामपंचायतीसाठी सर्वसाधारणला आरक्षण सोडत जाहिर करण्यात आली आहे. सर्वसाधारणसाठी ५१, ना.मा.प्र. २९, अनुसूचित जाती २०, अनुसूचित जमाती ७ अशा १०७ ग्रामपंचायतमध्ये आरक्षण सोडत जाहिर करण्यात आल्या आहेत.

सरपंच आरक्षण पुढील प्रमाणे आहे.

अडोळ (सर्वसाधारण महिला), लिंग पिंपरी (सर्वसाधारण), भगवती (सर्वसाधारण), सुलदली बु. (सर्वसाधारण महिला), देउळगाव जहा. (सर्वसाधारण), दाताडा बु. (सर्वसाधारण ), दाताडा खु. (सर्वसाधारण महिला), गुगुळ पिंपरी (सर्वसाधारण महिला), हत्ता (सर्वसाधारण), कहाकर बु. (सर्वसाधारण), वरखेडा (सर्वसाधारण), खिल्लार (सर्वसाधारण), खुडज (सर्वसाधारण महिला), कवरदड़ी (सर्वसाधारण महिला), लिंबाळा आमदरी (सर्वसाधारण महिला), म्हाळशी (सर्वसाधारण), माझोड (सर्वसाधारण महिला), म्हाळसापुर (सर्वसाधारण महिला), रिधोरा (सर्वसाधारण), शेगांव खोडके (सर्वसाधारण), गारखेडा (सर्वसाधारण महिला), सिनगी खांबा (सर्वसाधारण महिला), कोंडवाडा (सर्वसाधारण), वाघजाळी (सर्वसाधारण), वाढोणा (सर्वसाधारण महिला), वेलतुरा (सर्वसाधारण), पिंपरी बरडा (सर्वसाधारण महिला), खडकी (सर्वसाधारण), भानखेडा (सर्वसाधारण), केलसुला (सर्वसाधारण), कोळसा (सर्वसाधारण माहिला), डोंगरगांव (सर्वसाधारण महिला), ऊटी पूर्णा (सर्वसाधारण महिला), आमदरी (सर्वसाधारण महिला), मकोडी (सर्वसाधारण महिला), बोरखेड़ी पी. (सर्वसाधारण), भंडारी (सर्वसाधारण), लिंगदरी (सर्वसाधारण महिला), धनगरवाडी (सर्वसाधारण महिला), बटवाडी (सर्वसाधारण), वरुड काजी (सर्वसाधारण महिला), जयपुर (सर्वसाधारण), पानकनेरगांव (सर्वसाधारण महिला), पुसेगाव (सर्वसाधारण महिला), ब्राम्हणवाडा (सर्वसाधारण), धानोरा बं. (सर्वसाधारण), कारेगाव (सर्वसाधारण महिला), पारडी पोहकर (सर्वसाधारण), सुकळी बु. (सर्वसाधारण महिला), वरुड चक्रपान (सर्वसाधारण), गोरेगांव (सर्वसाधारण) ना.मा.प्र. साठी चोंढी खु. (महिला), चोंढी बु. (सर्वसाधारण), हिवरा, माहेरखेडा (सर्वसाधारण), हानकदरी (सर्वसाधारण), तळणी (महिला), कहाकर खुर्द (महिला), सावरखेडा (महिला), ऊटी ब्र. (महिला), वटकळी (महिला), सोनसावंगी (सर्वसाधारण), धोत्रा (सर्वसाधारण), बोरखेडी जी. (सर्वसाधारण), शिंदेफळ (महिला), साबलखेडा (सर्वसाधारण), केंद्रा बुद्रुक (सर्वसाधारण), सवना (महिला), आजेगांव (सर्वसाधारण), पळशी (महिला), चिखलागर (महिला), हाताळा (सर्वसाधारण), जवळा बु. (सर्वसाधारण), कवठा बु. (सर्वसाधारण), सापटगांव (महिला), घोरदरी (महिला), वडहिवरा (महिला), मन्नास पिंपरी (सर्वसाधारण), शिवणी बु. (सर्वसाधारण), खैरखेडा (महिला), जांभरुन बु. (सर्वसाधारण) अनुसूचित जातीसाठी ब्रम्हवाडी (महिला), केंद्रा खु. (महिला), चिंचखेडा (सर्वसाधारण), सूरजखेडा (महिला), साखरा (सर्वसाधारण) सुकळी खु. (सर्वसाधारण), शिवणी खु. (महिला), ताकतोडा (महिला), वायचाळ पिंपरी (महिला), बन (महिला), वझर खु. (महिला), सालेगांव (सर्वसाधारण), जामठी बु. (महिला), हिवरखेडा (महिला), सिनगी नागा (सर्वसाधारण), येलदरी (सर्वसाधारण), गोंडाळा (सर्वसाधारण), वलाना (सर्वसाधारण), कडोळी (सर्वसाधारण) बाभूळगांव (सर्वसाधारण) तर अनुसूचित जमातीसाठी जामदया (सर्वसाधारण), पाटोदा (महिला), गणेशपुर (महिला), कापडसिनगी (महिला), तांदूळवाडी (सर्वसाधारण), हुडी लिंबाळा (सर्वसाधारण) जांबआंध ( महिला) अशा एकूण १०७ ग्रामपंचायतच्या सरपंच आरक्षण सोडती जाहिर करण्यातआल्या आहेत. 

यावेळी तहसीलदार जिवनकुमार कांबळे, नायब तहसीलदार व पोलीस उपनिरीक्षक बाबूराव जाधव यांच्यासह कर्मचारी व लोकप्रतिनिधि उपस्थित होते.

संपादन - प्रल्हाद कांबळे

loading image