- धनंजय शेटे
भूम - तालुक्यातील ७४ ग्रामपंचायत ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची सोडत गुरुवारी (ता. १०) रोजी काढण्यात आली. शहरातील परांडा रोड वरील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात सोडतीचा कार्यक्रम झाला.
भूम तालुक्यातील ७४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा कालावधी संपला असल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने ही सोडत करण्यात आली. प्रभारी उपविभागीय अधिकारी जयवंत पाटील, नायब तहसीलदार प्रवीण जाधव, विकास राऊत, सागर बागडे उपस्थित होते.