Santosh Deshmukh Case
esakal
बीड - मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व निर्घुण हत्या प्रकरणात वाल्मीक कराड गॅंगवर विशेष मकोका न्यायालयात दोषारोप निश्चित झाल्यानंतर गुरुवारी (ता. आठ) झालेल्या सुनावणीत सरकारी पक्षाने कलम २९४ प्रमाणे पुराव्यांची यादी न्यायालयासमोर सादर केली. दरम्यान, पुढील सुनावणी २३ जानेवारीला होणार आहे.