Santosh Deshmukhsakal
मराठवाडा
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणात न्यायालयीन चौकशी पूर्ण; छाननी समिती कशासाठी?
Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख प्रकरणात सरकार काय निर्णय घेतं, हे पाहाणं महत्त्वाचं आहे. साधारण वर्षभरानंतर न्यायालयीन समितीचा अहवाल सरकारला सादर झाला आहे.
Beed Crime News: मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी पूर्ण झाली आहे. या प्रकरणासाठी नियुक्त केलेल्या न्यायमूर्ती एम.एल. ताहलियानी यांच्या एक सदस्यीय समितीने आपला अहवाल शासनाकडे सोपवला आहे. या अहवालातील निष्कर्ष आणि शिफारशींवर पुढील कारवाई निश्चित करण्यासाठी शासनाने अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय उच्चस्तरीय छाननी समिती स्थापन केली आहे.
