बीड - केज तालुक्यातील मस्साजोग येथील आदर्श गाव करणारे तरुण सरपंच संतोष देशमुख यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यास 26 तासांनी ग्रामस्थ व नातेवाईकांनी होकार दिला. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी ठोस आश्वासन दिल्यानंतर हा मार्ग निघाला.