Killedharur News : सरपंच संतोष देशमुख मारहाणीची छायाचित्रे व्हायरल होताच संताप; किल्लेधारूर कडकडीत बंद

सरपंच देशमुख यांच्या हत्येला तीन महिन्यांचा कालावधी उलटत आला आहे. या हत्यामागचे कृष्णा आंधळे वगळता इतर आरोपी जेरबंद करण्यात आले आहेत.
Killedharur Close
Killedharur Closesakal
Updated on

किल्लेधारूर (बीड) - सरपंच देशमुख यांच्या हत्येला तीन महिन्यांचा कालावधी उलटत आला आहे. या हत्यामागचे कृष्णा आंधळे वगळता इतर आरोपी जेरबंद करण्यात आले आहेत. या दरम्यान शासकीय यंत्रणेने याबाबत दोष पत्र दाखल केले असून, या दोष पत्रात देशमुख यांच्या मारहणीचे छायाचित्रे दाखल केले आहेत.

हे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत असून संताप व्यक्त होत आहे. या नराधमाच्या कौर्याचा निषेध म्हणून जिल्हा बंदची हाक दिली आहे, यास प्रतिसाद देत किल्लेधारूर सकाळ पासूनच कडेकोड बंद दिसून आले

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता जवळपास तीन महिन्यांचा कालावधी उलटला असून अजूनही एक मारेकरी बाहेर मोकाट फिरतोय. तर बाकीच्या आरोपींना मोक्का लावण्यात आला आहे. या निर्घृण हत्येने संपूर्ण राज्य हादरलं आहे.

संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. याच दरम्यान काल रात्री देशमुख यांच्या हत्येचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. अत्यंत क्रूरतेने, आणि बेदमपणे मारहाण करून देशमुख यांचा जीव घेण्यात आला.

त्यांच्या हत्येचे  हे फोटो समोर आले असून सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून, त्यामुळे तालुक्यात संतापाची लाट उसळल्याचं दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आज, मंगळवार ता. ०४ मार्च रोजी बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. या दृष्टीने किल्लेधारूर शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com