esakal | सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने ‘कही खुशी कही गम’ 
sakal

बोलून बातमी शोधा

sonpeth

परभणी जिल्ह्यातील सोनपेठ, पुर्णा, पालम, गंगाखेड, पाथरी तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या सोडती गुरुवारी (ता.१९) तालुक्याच्या तहसिल कार्यालयात काढण्यात आल्या. याबाबतचा घेतलेला हा आढावा.  

सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने ‘कही खुशी कही गम’ 

sakal_logo
By
गणेश पांडे

सोनपेठ ः सोनपेठ तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या सोडतीत ‘कही खुशी कही गम’ असे चित्र पहावयास मिळाले. तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतीमधील सन २०२० ते २०२५ या कालावधीत सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत तहसील कार्यालयात पार पडली. यात अनेक ठिकाणी फेरबदल झाल्याने ‘कही खुशी कही गम’ असे चित्र पाहायला मिळाले. 


तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतीच्या २०२०-२५ च्या सरपंचपदाचे आरक्षण काढण्यासाठी सोनपेठ तहसील कार्यालयात (ता.१९) सकाळी अकरा वाजता सोडत काढण्यात आली. या सोडतीत अनेक उलटफेर झाले असून सरपंच पदासाठी बाशिंग बांधून असलेल्या अनेकांचा हिरमोड झाला असून अनेकांना अनपेक्षितपणे सोडत लागल्याने उत्साह दिसून येत होता. तालुक्यातील बहुतांश मोठ्या ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे आरक्षित झाल्याने ग्रामीण भागातील पुढाऱ्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतीमध्ये २२ ग्रामपंचायत ह्या महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. त्यातील तीन ग्रामपंचायत ह्या अनुसूचित जाती साठी राखीव तर सहा नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. तसेच १३ ग्रामपंचायत ह्या सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. तर उर्वरित वीस ग्राम पंचायतींपैकी पाच ग्रामपंचायत नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी, तीन अनुसूचित जातीसाठी, बारा सर्वसाधारण सरपंचांसाठी राखीव झाल्या आहेत. 

ग्रामपंचायतीचे आरक्षण पुढीलप्रमाणे 
सर्वसाधारण महिलांसाठी असणाऱ्या वाणीसंगम, दुधगाव, उक्कडगाव, गंगापिंप्री, मोहळा, वाडी पिंपळगाव, नैकोटा, खपाट पिंपरी, निळा, लोहिग्राम, निमगाव, पारधवाडी, बुखतरवाडी अशा आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी महिला राखीव ग्राम पंचायत थडी उक्कडगाव, वंदन, डिघोळ ई, वडगाव, शिरोरी, भिषेगाव या आहेत. तर अनुसूचित जातीच्या महिलांसाठी नरवाडी, शेळगाव, तीवठाणा ह्या गावांचे सरपंच पद राखीव झाले आहे. तसेच खडका, थडी पिंपळगाव, धार डिघोळ ह्या ग्राम पंचायतीचे सरपंच पद हे अनुसूचित जातीसाठी राखीव झाले आहे. गवळी पिंपरी, आवलगाव, चुकार पिंपरी, लासीना, देवी नगर तांडा ह्या ग्राम पंचायती नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव झाल्या आहेत. तर पोहोंडुळ, करम, धामोनी, उखळी, शिर्शी बु, वैतागवाडी, सायखेडा, विटा खु. कोरटेक, कान्हेगाव, बोंदरगाव व कोठाळा या ग्राम पंचायतीचे सरपंचपद हे सर्वसाधारण सुटले आहे. या सोडतीसाठी तालुकाभरातील गाव पुढाऱ्यांमोठी गर्दी केली होती. यासाठी तहसीलदार डॉ. आशिषकुमार बिरादार, नायब तहसीलदार घनसावंत, पेशकार नारायण पिंपळे, वाघमारे आदी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 

हेही वाचा - परभणीतील १८ वॉटर प्लांट्स सील ; अनेकांनी गाशा गुंडाळला

पाथरी तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीची सोडत 
पाथरी ः तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण गुरुवारी (ता.१९) रोजी काढण्यात आले. यात अनुसूचित जाती आठ, अनुसूचित जमाती प्रवर्ग (ओबीसी) १३, सर्वसाधारण महिलांसाठी १४ व पुरुषांसाठी १४ असे आरक्षण काढण्यात आले. ती पुढीलप्रमाणे, अनुसूचित जाती महिला चाटेपिंपळगाव, फुलरवाडी, जवळाझुटा, रामपुरी खुर्द. सर्वसाधारण वडी, जेतापूरवाडी, रेणापूर, रेनाखळी. ओबीसी महिला डोंगरगाव, पाथरगव्हान खुर्द, आनंदनगर, डाकुपिंप्री, लोणी बु, निवळी, मार्ड्सगाव. सर्वसाधारण मसाला खुर्द, सारोळा बु, सिमुरगव्हान, अंधापुरी, बांदरवाडा, ढालेगाव. सर्वसाधारण महिला लिंबा, बोरगव्हान, मंजरथ, पोहेटाकळी, गोंडगाव, बाबूलतार, खेडुळा, झरी, गुंज खुर्द, बाभळगाव, हादगाव, तुरा, विटा, कानसुर, कानसुर तांडा. सर्वसाधारण खेर्डा, पाटोदा गं की, मुदगल, कासापुरी, देवेगाव, वाघाळा, नाथरा, देवनांद्रा, टाकळगव्हान, टाकळगव्हान तांडा, वरखेड, किन्होळा, बानेगाव, उमरा, गोपेगाव, पाथरगव्हान बु. दरम्यान, उमरा, वाघाळा, खेर्डा, वरखेड, कासापुरी. देवनांद्रा, नाथरा, पाथरगव्हान बु, कानसुर, हादगाव, मरडसगाव, व लोणी बु. मातब्बर गाव पुढारी असलेल्या रेणापूर, वडी, रामपुरी, डोंगरगाव, सारोळा बु, लोणी बु, मरडसगाव या ग्रामपंचायती आरक्षणात आल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीचा वेळ सकाळी अकरा वाजता ठेवण्यात आला असतांनाही प्रशासनाच्या नियोजनाअभावी एक तास उशिराने आरक्षण सोडत झाली. या वेळी उपस्थित ग्रामीण भागातील पुढारी व ग्रामस्थ वैतागले होते.

हेही वाचा - परभणीत पहिल्याच दिवशी दीडशे शिक्षकांच्या आरटीपीसीआर टेस्ट 

पालम तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर 
पालम ः तालुक्यातील विविध प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. यामध्ये अनुसूचित जातीसाठी नऊ, अनुसूचित जमातीसाठी तीन, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी अठरा व सर्वसाधारण प्रवर्गासाठी ३६ अशा एकूण ६६ ग्रामपंचायतीचे आरक्षण चिट्टी पद्धतीने जाहीर करण्यात आले. यामध्ये अनुसूचित जाती पुरुष प्रवर्गामध्ये फळा, पेठशिवणी, बोरगाव बुद्रुक, उकडगाव पेंडू खुर्द. महिलांमध्ये गुळखंड, रावराजुर, फरकंडा, खुर्डूवाडी. अनुसूचित जमातीमध्ये पुरुष वनभुजवाडी, महिलांमध्ये पेठपिंपळगाव, कोळवाडी, 
नामा प्रवर्गामध्ये पुरुष प्रवर्गामध्ये धनेवाडी, रोकडेवाडी, भालकुडकी, सिरसम, तांबुळगाव, चोरवड, लांडकवाडी, दिग्रस, घोडा तर महिलांमध्ये पारवा, खोरस, राहटी, वाडी खुर्द, वाडी बुद्रुक, वरखेड, तांदुळवाडी कापसी, मोजमाबाद, बोरगाव खुर्द. 
सर्वसाधारण पुरुष आडगाव, दुटका, पिंपळगाव, मुरुडदेव, तुळजापूर, गुंज, शेखराजुर, शिरपूर, सादलापूर, बनवस, आरखेड नावगाव वाडी कोनेरवाडी, खरब धानोरा, खडी, पुयणी, सायळा, उमरथडी, रामापुर. महिलांमध्ये बंदरवाडी, मार्तंडवाडी, उमरा, जवळा मुदखेड, पोखर्णी देवी, आजमाबाद, गिरधरवाडी, सेलू, डोंगरगाव, नावा, सदगीरवाडी, पेंडू बुद्रुक, सातेगाव, फत्तुनाईक, आनंदवाडी, चाटोरी, महादेववाडी आदी गावात पारंपरिक पद्धतीने आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले. 

पूर्णा तालुक्यातील ७९ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर 
पूर्णा ः तालुक्यातील ७९ ग्रामपंचायतीच्या आरक्षणाची सोडत गुरुवारी (ता.१९) सकाळी अकरा वाजता येथील तहसील कार्यलयात तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. आरक्षण पुढीलप्रमाणे, अनुसूचित जाती प्रवर्ग: गौर, रेगाव, बाणेगाव/माहेर, गोळेगाव, दस्तापूर, वझूर. अनुसूचित जाती महिला : लिमला, एकरुखा, देवूळगाव दुधाटे, कळगाव/कळगाववाडी, पिंपळगाव बाळापूर, फुकटगाव. अनुसूचित जमाती : इठलापूर माळी. नागरिकांचा मागास प्रवर्ग : कलमुला, लोण खुर्द, आव्हई, बरबडी, एरंडेश्वर, देगाव, फुलकळस, मजलापूर, महागाव, हटकरवाडी, सुहागन. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला : धनगर टाकळी, कावलगाव, पेनूर, संदलापूर, रुपला सुकी, धानोरा काळे, आडगाव लासिना, पिंपळगाव लिखा, ममदापूर/गणपूर/ कांजनापूर. सर्वसाधारण : माखनी, धानोरा मोत्या, आहेरवाडी, लक्ष्मणनगर, चांगेफळ, कातनेश्वर, खरबडा, ताडकळस, पांगरा लासिना, मुंबर, कमलापूर, सातेफळ, बलसा बुद्रूक/इस्माईलपूर/रामापूर, हिवरा बुद्रूक, धोत्रा, अजदापूर, आडगाव सुगाव, वाई, सुरवाडी, नऱ्हापूर, कंठेश्वर /सातेगाव, गोविंदपूर/मरसूल, पिंपरण. सर्वसाधारण महिला आरक्षण : कावलगाववाडी, सोन्ना, भाटेगाव, शिरकळस/ तामकळस, देवठाणा, चुडावा, कानेगाव, खडाळा, आलेगाव, माटेगाव, निळा, रुंज, पिंपळगाव सारंगी /मिठापूर, पिंपळा भत्त्या, खुजडा, नावकी / वडगाव/पांढरी, खांबेगाव/महातपूरी, कौडगाव, सोनखेड, दगडवाडी पिंपळा लोखंडे, कानडखेड. 

गंगाखेड तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतीचा समावेश 
गंगाखेड ः तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपल्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्यात आले होते. परंतू, राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतनिहाय सरपंचपदाचे आरक्षण सोडत (ता.१९) रोजी जाहीर झाली. यामध्ये (अनुसूचित जातीसाठी) सुरळवाडी, धारासूर, चिलगरवाडी, तांदुळवाडी, बेलवाडी,उंबरवाडी तसेच (अनुसूचित जाती महिला संवर्गासाठी) सुप्पा, खोकलेवाडी, सायाळा सु, डोंगरगाव, वागदरा, वरवंटी, तसेच (अनुसूचित जमातीसाठी) हरंगुळ व (अनुसूचित जमाती महिला संवर्गासाठी) घटांग्रा त्याचबरोबर (नागरीकांचा मागास प्रवर्गासाठी) मरगळवाडी, डोंगरपिंपळा, माखणी, मालेवाडी, धनगर मोहा बनपिंपळा, शेंडगा, पांगरी, शंकरवाडी, अंतरवेली, गोदावरी तांडा, लिंबेवाडी या ग्रामपंचायत असून (मागास प्रवर्ग महिलांसाठी) पडेगाव, ढग्याचीवाडी, नरळद खंडाळी, शेलमोहा, ईळेगाव, पांढरगाव, टोकवाडी, देवकतवाडी, बोथी, गौडगाव तसेच (सर्वसाधारण) मध्ये आरबुजवाडी, भेंडेवाडी, भांबरवाडी, अकोली चिंचटाकळी, दगडवाडी, डोंगरजवळा, खळी, कवडगाव, नागठाणा, निळानाईक तांडा, पिंपळदरी, पोखर्णी वा. रूमणा ज., उंडेगाव, उखळी खु, वाघलगाव, इरळद , कातकरवाडी कासारवाडी गुंजेगाव वागदरी बोर्डा आदी ग्रामपंचायतीचा समावेश असून (सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी) आनंदवाडी, दामपुरी, धारखेड, ढवळेवाडी, इसाद, गोपा, जवळा, खादगाव, मुळी, महातपुरी, मरडसगाव, मसला, मानकादेवी, मसनेरवाडी, पिंपरी झोला, राणीसावरगाव, सिरसम, झोला, मौराळसावंगी, बडवणी, सांगळेवाडी, दुसलगाव, कोद्री, गौळवाडी आदी ग्रामपंचायतीचा समावेश आहे. 

 

संपादन ः राजन मंगरुळकर