केज : कुटुंबातून वेगळे राहण्याचा कारणावरून झालेल्या वादातून एका वृद्धास सून व तिच्या माहेरच्या नातेवाइकांनी मारहाण केल्याची घटना रविवारी (ता.१५) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दहिफळ (वडमाऊली) येथे घडली. या प्रकरणी तिघांविरोधात पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.