
तेर : धाराशिव तालुक्यातील तेर येथे कै.रामलिंगप्पा लामतुरे शासकीय पुराणवस्तू संग्रहालयात सातवाहन काळातील मेगॅरीयन भांडी पहावयास मिळतात. धाराशिव तालुक्यातील तेर येथे परकीय संपर्क दर्शविणाऱ्या या वस्तूंमध्ये नक्षीदार बूड असलेल्या, लाल रंगाच्या उत्कृष्ट भाजणीच्या बोळक्याचा समावेश करता येईल. या पद्धतीत कुंभार नेहमीप्रमाणे चाकावर भांडे ठेवून त्याला विविक्षित आकार देतो. पण, भांड्याच्या बुडाच्या गोलाकार भागावर थोडी अधिक माती ठेवून भांडे भाजण्यापूर्वी हे बूड नक्षी असलेल्या दोन साच्यात दाबून ही नक्षी भांड्यावर उमटवितो.