

Farmers have announced a protest on July 30, demanding a review of the satellite report and immediate release of crop insurance benefits.
जेवळी : खरीप २०२५ मधील पीक विमा नुकसानीच्या लाभापासून लोहारा तालुक्यातील जेवळी, माकणी आणि धानुरी या तीन महसूल मंडळांना पूर्णपणे वगळण्यात आले आहे. सॅटॅलाइट उपग्रहाच्या तांत्रिक निकषांचा आधार घेत विमा कंपनीने घेतलेल्या या वादग्रस्त निर्णयामुळे तालुक्यातील तब्बल ७५ टक्के शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. एकीकडे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची कबुली देऊन शासनाने मदत वाटप केले असताना, दुसरीकडे विमा कंपनीने मात्र तांत्रिकतेचा खोळंबा घालत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. यामुळे शेतकरी वर्गात तीव्र संतापाची लाट उसळली असून, शेतकरी आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.