Satish Bhosale, BJP leader Suresh Dhas’ close aide, arrested in Prayagraj after a long police chase. Allegations of crime and land encroachment surfaceesakal
मराठवाडा
Satish Bhosale Arrest: अखेर खोक्या प्रयागराजमध्ये सापडला... सुरेश धसांचा गुंड कार्यकर्ता सतीश भोसलेला अटक
Satish Bhosale Arrested in Prayagraj: A Major Crackdown : प्रयागराजमध्ये बीड पोलिसांची मोठी कारवाई, अनेक गंभीर गुन्ह्यांतील आरोपीला पकडले.
बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी विश्वातील कुख्यात गुंड आणि भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्या याला अखेर प्रयागराज येथे पोलीसांनी अटक केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस त्याच्या मागावर होते, मात्र तो सतत ठिकाणं बदलत होता. अखेर, गुप्त माहितीच्या आधारे बीड पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्तपणे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

