
गेवराई : युरोपमध्ये होणाऱ्या कुडो(कराटे) वर्ल्डकप स्पर्धेसाठी बीडमधील गेवराईतील सौरभ जाधव याची निवड झाली असून,त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी सौरभला सत्कारीत करुन स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. युरोपमध्ये होणाऱ्या कुडो वर्ल्ड कप स्पर्धेसाठी फेब्रुवारीच्या सात तारखेला ॲथलेटीका फिटनेस, सूरत येथे वर्ल्ड कप निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते.