

MSEDCL detected power theft by 24 consumers during a special inspection drive in Savkheda village of Gangapur taluka.
Sakal
शेंदूरवादा : गंगापूर तालुक्यातील महावितरणच्या शेंदूरवादा उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या सावखेडा गावात मंगळवारी (ता.१४) महावितरणच्या वतीने वीजचोरीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. या धडक कारवाईत तब्बल २४ आकडेबहादरांकडून सुरू असलेली वीजचोरी उघडकीस आली असून संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे परिसरातील आकडेबहादरांचे चांगले ढाबे दणाणले आहे.