
परभणी : सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबरपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश बजावल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून निद्रिस्त झालेले इच्छुक उमेदवार खडबडून जागे झाले आहेत. अनेक जणांनी प्रभागात फेरफटका मारण्यास सुरवात करून जुन्या ओळखींना उजाळा देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.