पोहण्यासाठी गेलेल्या शाळकरी  मुलाचा बुडून मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 सप्टेंबर 2019

पारध, (जि. जालना)  : शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दहा वर्षीय शाळकरी मुलाचा 
पाण्यात बुडून मृत्यू झाला, सोमवारी (ता. दोन) पहाटे दोन वाजता ही घटना उघडकीस आली. आदित्य संदीप खंडाळे (वय दहा) मोहळाई (ता. भोकरदन) असे मृत मुलाचे नाव आहे. 

आजोबांकडे शिक्षण घेत असलेला आदित्य खंडाळे (मूळ, रा. जांब, ता. जि. बुलडाणा) हा रविवारी (ता. एक) मोहळाई येथील भागवत पांडुरंग पालकर यांच्या शेततळ्यात सायंकाळी पाच दरम्यान पोहण्यासाठी गेला होता. पोहता येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. याची माहिती उत्तम मैनाजी पानपाटील यांनी पारध पोलिसांना सोमवारी (ता. दोन) पहाटे दिल्यावरून पोलिसांनी आदित्यचा मृतदेह पाण्यातून काढून वालसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करण्यात आली. मोहळाई येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

आदित्य होता एकुलता एक 
आदित्य हा त्याच्या वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या आईचे आठ वर्षांपूर्वी निधन झाले आहे. वडील त्याच्याकडे लक्ष देत नसल्यामुळे आजोबांनीच त्याचा सांभाळ केला, त्यामुळे त्याच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: school boy dies after falling into the water