
कळंब : मुलांची पँट, शर्ट ढगळ, तर मुलींना गणवेश बसत नाही. काही विद्यार्थ्यांना पँट आणि शर्ट गुडघ्यापर्यंत, गणवेशाची बाही आखूड, लांब येत असल्याने गणवेशाबाबतचे त्रांगडे अजून सुटलेले नाही. शासनाने महिला आर्थिक विकास महामंडळाकडून शिवून घेतलेले गणवेश तालुक्यातील ५० टक्के शाळांतील विद्यार्थ्यांना मिळालेच नाहीत.