
बिडकीन : येथील सरस्वती भुवन प्रशालेतील नववीची विद्यार्थिनी श्रद्धा तांबे ही शनिवारी दुपारी १ वाजता शाळा सुटल्यानंतर पायी घरी जात होती. दरम्यान, अज्ञात व्यक्तीने तिच्या वडिलांची ओळख सांगून तिला दुचाकीवर बसण्यासाठी सांगितले. यावेळी तिने समयसूचकता दाखवून अज्ञात व्यक्तीला प्रतिप्रश्न करत अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडला.