

बीड : आधारकार्ड प्रमाणेच विद्यार्थ्यांची स्वतंत्र शैक्षणिक माहिती डिजिटल स्वरूपात साठविण्याच्या उद्देशाने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने प्रत्येक विद्यार्थ्याचा ‘अपार’ (ऑटोमेटेड पर्मनंट अकॅडमिक रजिस्ट्री) नंबर तयार करण्याच्या सूचना जिल्हा परिषदांना दिल्या आहेत. त्यानुसार एक महिन्यात जिल्ह्यातील ६२ टक्के विद्यार्थ्यांचे अपार नंबर काढण्यात आले आहेत.