CM Devendra Fadnavis
sakal
लातूर - मराठवाडा वॉटर ग्रीड हा अतिशय महत्त्वकांक्षी प्रकल्प होता. पण, महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्यांनी हा प्रकल्प बंद केला. गुंडाळला. केंद्र सरकारकडून आलेले जलजीवनचे पैसे मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाकरिता वापरता आले असते. पण, दुर्दैवाने तसे न करता त्यांनी अन्यत्र वापरले. त्यामुळे निश्चितच एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मविआ'वर टीका केली. मराठवाड्यात पाणी आणणे हे आमचे पहिले प्राधान्य आहे, असेही ते म्हणाले.