

पाथरी : येथील माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यावर पाच दिवसांच्या फरकाने सोमवारी (ता.१७) दुसऱ्या गुन्ह्याची नोंद झाली. यावेळी नगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्याला मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्यासह इतर सात जणांवर पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.