esakal | लातूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पाऊस
sakal

बोलून बातमी शोधा

पाऊस

सर्वच मंडळांत हजेरी; खरीप पिकांना मिळाले जीवदान 

लातूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पाऊस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लातूर ः  गेल्या काही दिवसांपासून पाठ फिरवलेल्या पावसाने जिल्ह्यात दोन दिवसांपासून हजेरी लावली आहे. या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. 


रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 21 मिलिमीटर पाऊस पडला आहे. यात महसूल मंडळनिहाय पडेलला पाऊस पुढीलप्रमाणे आहे. लातूर 13, कासारखेडा 34, गातेगाव सहा, तांदुळजा 15, मुरूड 19, बाभळगाव 20, हरंगुळ 14, चिंचोली 19, औसा चार, किल्लारी पाच, मातोळा चार, भादा आठ, किनिथोट पाच, रेणापूर 35, पोहरेगाव 28, कारेपूर 47, पानगाव 36, उदगीर 17, मोघा 15, हेर 16, देवर्जन 14, वाढवणा 28, नळगीर 14, नागलगाव सात, अहमदपूर 42, किनगाव 44, खंडाळी 48, शिरूर ताजबंद 30, हाडोळती 36, अंधोरी 53, चाकूर 24, वडवळ नागनाथ 29, नळेगाव 20, झरी 35, शेळगाव 37,

जळकोट 66, घोणसी 22, निलंगा आठ, अंबुलगा पाच, कासारशिरसी 14, मदनसुरी चार, औराद आठ, कासारबालकुंदा 21, निटूर चार, पानचिंचोली पाच, देवणी 11, वलांडी चार, बोरोळ नऊ, शिरूर अनंतपाळ तीन, हिसामाबाद सात आणि साकोळ मंडळात सात मिलिमीटर पाऊस पडला आहे. 


जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 355.72 मिलिमीटर पाऊस पडला आहे. यात लातूर तालुक्‍यात 233.91, औसा 237.28, रेणापूर 332.13, उदगीर 341.87, अहमदपूर 511.99, चाकूर 349.60, जळकोट 491.50, निलंगा 375.75, देवणी 369.48, शिरूर अनंतपाळ तालुक्‍यात 313.66 मिलिमीटर पाऊस झाला आहे. 

loading image
go to top