बीड जिल्ह्यात कोरोनाचा दुसरा बळी, नव्या सहा रुग्णांसह ७६ कोरोनाग्रस्त 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 8 June 2020

मातावळी (ता. आष्टी) येथील ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यूनंतर कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळला. यापूर्वी मुंबईहून पाटण सांगवी (ता. आष्टी) येथे नातेवाइकांकडे आलेल्या पिंपळगाव हुडा (जि. नगर) येथील महिलेचा मृत्यू झाला होता. 

बीड : जिल्ह्यात सोमवारी (ता. आठ) कोरोनाचा दुसरा बळी गेला. मातावळी (ता. आष्टी) येथील ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यूनंतर कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळला. यापूर्वी मुंबईहून पाटण सांगवी (ता. आष्टी) येथे नातेवाइकांकडे आलेल्या पिंपळगाव हुडा (जि. नगर) येथील महिलेचा मृत्यू झाला होता. 

दरम्यान, सोमवारी या तरुणासह इतर पाच नवीन रुग्ण आढळले. यात बीड शहरातील मसरतनगर येथील तिघांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले असून हे तिघे हैदराबादहून आलेले आहेत. यासह अंबेवडगाव (ता. धारूर) व मालेगाव खुर्द (ता. गेवराई) येथेही नवीन रुग्ण आढळले.

हेही वाचा : कोरोनाबद्दल साहित्यिक म्हणतात.. 

मुंबईहून मातकुळी (ता. आष्टी) येथे परतलेल्या कुटुंबातील पती-पत्नीसह दोन मुलांची तपासणी केली. यात पत्नी व मुलांचे स्वॅब निगेटिव्ह आले. मात्र, तरुणाच्या स्वॅबचा अहवालाचा दोनवेळा निष्कर्ष निघाला नव्हता. रविवारी (ता. सात) रात्री उशिरा स्वॅब घेतल्यानंतर सोमवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. त्याचा अहवालही पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यात मृत्यू झालेल्यांची संख्या दोन झाली. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Second victim of corona in Beed district, 76 corona infected with six new patients