Shendurwada News : जप्त केलेला जेसीबी रात्रीच गायब; महसूल प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारावर प्रश्नचिन्ह?

नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर सोमवारी (ता. ११) धडक कारवाई करण्यात आली. मात्र...
JCB

JCB

sakal

Updated on

शेंदूरवादा - दैनिक सकाळच्या 'कुठेय तलाठी?' या वृत्तमालिकेतून गंगापूर तालुक्यातील महसूल यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर सातत्याने प्रकाश टाकल्यानंतर महसूल प्रशासनाने पिंपळवाडी शिवारातील शिवना नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर सोमवारी (ता. ११) दुपारी धडक कारवाई करण्यात आली. मात्र, या कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेला एक जेसीबी रात्रीच गायब झाल्याने महसूल प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com