गावचा विकास करण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या- अब्दुल सत्तार 

राजेश दारव्हेकर
Wednesday, 13 January 2021

शहरालगत असलेल्या बळसोंड ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भात महाविकास आघाडी पँनलच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ महसूल मंत्री अब्दुल सत्तार या़ची मंगळवारी जाहीर सभा झाली

हिंगोली : गावचा चेहरा मोहरा बदलून विकासाची कामे करण्यासाठी महाविकास आघाडी पँनलच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन महसूल मंत्री अब्दुल सत्तार यांनी जाहीर सभेत मंगळवारी ता. १२ बळसोंड येथे केले. 

 

शहरालगत असलेल्या बळसोंड ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भात महाविकास आघाडी पँनलच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ महसूल मंत्री अब्दुल सत्तार या़ची मंगळवारी जाहीर सभा झाली यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार स़ंतोष बांगर,माजीमंत्री अर्जुन खोतकर, माजी खासदार शिवाजी माने, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, संतोष गोरे, प्रकाश कावरखे, माजी नगराध्यक्ष गणेश लुंगे, राम कदम यांच्यासह महाविकास आघाडीचे उमेदवार यांची उपस्थिती होती. 

 

यावेळी बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले गावात विकासाची गंगा आणण्यासाठी व गावचा सर्वागीण विकास करण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी माझ्यावर जबाबदारी दिली आहे. यामुळे ती पार पाडण्यासाठी गावोगाव विकासाची कामे सुरू आहेत. त्यामुळे बळसोंड गावचा विकास करण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडणूक देण्याचे आवाहन अब्दुल सत्तार यांनी जाहीर सभेत केले.

 

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Select the candidates of Mahavikas Aghadi for the development of the village Abdul Sattar hingoli news