बचतगटांच्या मास्कला कर्नाटकातही मागणी, निर्मितीत लातूर जिल्हा राज्यात आघाडीवर

Self Help Group Latur, Latur News
Self Help Group Latur, Latur News
Updated on

लातूर  ः कोरोनामुळे निर्माण झालेल्या आपत्तीचे संधीत रूपांतर करण्याचा प्रयत्न जिल्ह्यातील बचतगटांच्या महिला करीत आहेत. वाढती मागणी लक्षात घेऊन त्या मास्क तयार करीत आहेत. त्याला स्थानिक तसेच कर्नाटकमधून मागणी आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तीन लाख ७५ हजार मास्क तयार करण्यात आले असून, त्यापैकी ६५ हजार मास्क कर्नाटकात पाठवण्यात आले आहेत. त्यातून महिलांच्या हाताला घरबसल्या रोजगार मिळाला आहे. बचतगटांमार्फत मास्क निर्मितीत राज्यात हा जिल्हा आघाडीवर आहे.

६३ बचतगटांचा पुढाकार
मोठ्या मागणीमुळे जिल्ह्यातील ६३ बचतगट मास्क तयार करीत आहेत. त्यातून सहाशेपेक्षा जास्त महिलांना रोजगार मिळाला आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मास्क बनविण्याबाबत माहिती दिली. काहींनी युट्यूबचा वापर करून मास्क तयार केले आहेत.

४० लाखांचा व्यवहार
बचतगटांनी आतापर्यंत तीन लाख ७० हजार ९४१ मास्क तयार केले असून त्यापैकी तीन लाख ३० हजार ७६० मास्कची विक्री झाली आहे. प्रति मास्क दहा ते पंचवीस रुपये दर आहे. बचतगटांनी आतापर्यंत ४० लाख २७ हजार ४८५ रुपयांचा व्यवहार केला आहे. लातूर जिल्हा कर्नाटकच्या सीमेवर आहे. सीमेलगतच्या गावांतील बचतगटही मास्क तयार करीत आहेत. कर्नाटकातील नागरिकांनी काही बचतगटाशी संपर्क साधून मास्कची मागणी केली होती. त्यानुसार आतापर्यंत ६५ हजार मास्क कर्नाटकात गेले असून, सात लाख ८० हजार रुपयांचे उत्पन्नही बचतगटांना मिळाले.



लॉकडाउनच्या काळात बचतगटांना काम मिळावे म्हणून हा उपक्रम सुरू केला. मास्कला चांगली मागणी आहे. बचतगटांमार्फत मास्क तयार करण्यात लातूर जिल्हा राज्यात आघाडीवर आहे.
- संतोष जोशी, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, लातूर


निलंगा तालुक्यातील पंधरा ते वीस गावांतील महिलांना मास्कच्या माध्यमातून काम देण्यात आले आहे. त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. मास्कला कर्नाटकमधूनही मागणी आहे. वेगवेगळ्या बचतगटांकडून आतापर्यंत ६५ हजार मास्क कर्नाटकात गेले आहेत. महिलांना घरबसल्या रोजगार उपलब्ध झाला आहे.
- भाग्यश्री मुगळे, सदस्य, शिवपार्वती महिला बचतगट, हलगरा (ता. निलंगा)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com