सेलू : कोरोना अजून संपला नाही, काळजी घ्या-  डाॅ. संजय हरबडे

file photo
file photo
Updated on

सेलू ( जिल्हा परभणी ) : कोरोना या रोगाने देशातील सर्व नागरिकांना चांगलेच जेरिश आणले. (ता. २२) मार्च पासून राज्यात आलेला कोरोना हा रोग अजून संपला नाही.त्यासाठी प्रत्येक नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी असे आवाहन येथिल उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डाॅ. संजय हरबडे यांनी केले आहे.

कोरोना या रोगाचा शिरकाव झाल्यापासून ते आजपर्यंत सेलू शहरी भागात २१०  रुग्ण आढळून आले. त्यापैकी चार रूग्णांचा मृत्यू तर नऊ जणावर उपचार सुरू आहेत. तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात

कोरोनाचे रूग्ण एकूण ८७ अाढळले.त्यापेकी चार रूग्णांचा मृत्यु झाला तर चार रूग्णावर उपचार सुरू आहेत. कोरोना रोगाचे सर्वत्र थैमान सुरू असतांना अनेक वेळा शहरात प्रशासनाकडून जिल्हाभरात लाॅकडाऊन करण्यात आले. सेलू शहरासह तालुक्यात कोरोना रोगाला आटोक्यात आणण्यासाठी महसुल प्रशासन, नगर पालिका प्रशासन व उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डाॅ. संजय हरबडे यांनी आपआपल्या अधिकारात वेळोवेळी सेलू शहर व ग्रामीण भागात कटाक्षाने लक्ष देवून शहरासह तालुक्यातून कोरोना बाधितांवर तहसिल रोडवरिल डाॅ. बाबासाहेब आबेडकर शासकिय वसतिगृहात उपचार सुरू केले.तेथे रूग्णांना वेळेत योग्य अाहार व त्यांच्याकडून सकाळ, संध्याकाळ योगासने डाॅ. संजय हरबडे यांनी करून घेतली.

त्यामुळे कोरोना बाधितांवर वेळेवर उपचार झाल्याने त्यात अनेकजण बरे झाले.जिल्ह्याचे पालकमंत्री परभणी दौर्‍यावर आले असतांना त्यांनी सेलूच्या कार्यपध्दतींचा अवलंब करण्याचे संकेत इतर तालुक्यांना दिले होते.तर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे परभणीत आले असता त्यांनी सेलूचे वैद्यकिय अधिक्षक डाॅ.संजय  हरबडे यांचा कोरोना योध्दा म्हणून सन्मान केला.

मार्च पासून जवळपास सर्व दळणवळणाची साधने बंद होती. लॉकडाऊन सुरू झाले होते, परंतु सद्य:स्थितीत बस, रेल्वे सुरू झाल्या आहेत. मार्च पासूनच्या नागरिकांच्या भेटीगाठी होणार आहेत. परंतु आपण अजून कोरोना मुक्त झालेला नाहीत. त्यामूळे आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे. शक्यतो प्रवास टाळाच, नाहीतर किमान दोन फूट अंतर, मास्क वाफरने, वारंवार हात धुणे ह्या गोष्टी पाळाव्यात अशी प्रतिक्रिया उपजिल्हा रुग्णालयाचे डाॅ. सजय हरबडे यांनी दिली.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com