

Parbhani News
esakal
देवगावफाटा: वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य उष्माघाताच्या घटनांना आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाने व्यापक तयारी केली आहे. सेलू तालुक्यातील चिकलठाणा बुद्रूक, वालुर, देऊळगाव गात येथील आरोग्य केंद्रांत विशेष ‘उष्माघात उपचार कक्ष’ कार्यान्वित करण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ उपचार मिळावेत यासाठी आवश्यक सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.