Illegal Sand Transportation: अवैध वाळू वाहतुकीने घेतला जीव; सेलूत हायवा टिप्पर अपघातांमुळे नागरिकांचा संताप

Parbhani News: सेलू परिसरात अवैध वाळू व इतर गौण खनिजांच्या वाहतुकीमुळे अपघातांची मालिका सुरूच असून नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.
Illegal Sand Transportation

Illegal Sand Transportation

esakal

Updated on

सेलू : शहरातील परभणी रस्त्यावरील जलशुद्धीकरण केंद्र आणि मदरसा टी पाॅइंटवर ता. २१ फेब्रुवारी रोजी हायवा टिप्परचा आपघात डुघरा गावातील ५५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. घरातील कर्ता माणूस गेल्याने नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.

अर्थात, अशा प्रकारचे अपघात पंचक्रोशीतील नागरिकांना नवीन नाहीत. अपघात घडतो, एखाद्याचा बळी जातो, त्या वेळेपुरता संताप होतो. दोन-चार दिवसांत सारं काही विसरून प्रत्येक जण कामाला लागतो. हा नित्याचा अनुभव. पण, त्यातून महसूल, पोलिस किंवा आरटीओ यापैकी एकही यंत्रणा धडा घ्यायला तयार नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com