Parbhani News: शेतकरी, नागरी, उद्योजकांचे हाल; सेलूत १३२ केव्ही केंद्र प्रतीक्षेत; नागरिक बेजार
132 kV Substation in Selu Still Pending: सेलू शहर व तालुक्यातील नागरिक, शेतकरी व उद्योगवाले १३२ केव्ही वीजकेंद्र न बसल्यामुळे विजेच्या तुटवड्याने त्रस्त; उद्योग, शेती आणि दैनंदिन जीवनावर परिणाम.
सेलू : १३२ केव्ही वीजकेंद्र अद्यापही प्रतीक्षेत असून शहरासह तालुक्यातील उद्योजक, व्यावसायिक, शेतकऱ्यांसह नागरिक विजेच्या लंपडावाने त्रस्त झाले आहेत. उष्णतेची लाट आणि अनियमित भारनियमनामुळे सर्व हैराण झाले आहेत.