

Turmeric crops in Selu taluka are drying up as drought conditions leave farmers without sufficient irrigation water
esakal
देवगावफाटा, : मागीलवर्षी हळदीला मिळालेल्या समाधानकारक बाजारभावामुळे यंदा मोठ्या अपेक्षेने लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना दुष्काळामुळे मोठा आर्थिक फटका बसत आहे. सेलू तालुक्यात सुमारे पाच हजार हेक्टर क्षेत्रावर हळदीची लागवड झाली आहे. मात्र, पावसाने ओढ दिल्याने विहिरी, बोअरवेल आटल्या आहेत. सिंचनासाठी पाणी नसल्याने अनेक शेतकऱ्यांवर निम्म्याहून अधिक क्षेत्रावरील पीक सोडून देण्याची वेळ आली आहे.