Shriram Rajurkar Passes Away : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीराम पाटील राजुरकर यांचे निधन; नांदेडच्या ग्रामीण राजकारणातील एक संयमी, विकासाभिमुख नेतृत्व हरपले

नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ग्रामीण विकासाच्या राजकारणाला वेगळी दिशा देणारे अनुभवी लोकनेते श्रीराम पाटील राजुरकर यांचे खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.
Senior Congress Leader Shriram Patil Rajurkar Passes Away

Senior Congress Leader Shriram Patil Rajurkar Passes Away

sakal

Updated on

देगलूर - नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ग्रामीण विकासाच्या राजकारणाला वेगळी दिशा देणारे अनुभवी लोकनेते श्रीराम पाटील राजुरकर यांचे बुधवारी (१ जुलै) नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने नांदेड जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील अभ्यासू, संयमी व विकासाभिमुख नेतृत्वाचा आधार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी (२ जुलै) दुपारी १ वाजता मुखेड तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी राजुरा (बु.) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे आणि पतवंडे असा मोठा परिवार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com