जिल्ह्यात सोमवारपासून दुसऱ्यांदा सात दिवसाची संचार बंदी लागू

A seven day curfew has been imposed in Hingoli district since Monday
A seven day curfew has been imposed in Hingoli district since Monday
Updated on

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्यास रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सोमवार (ता. २९) एप्रिल पासून पुन्हा दुसऱ्यांदा संचारबंदी लागू केल्याचे आदेश शनिवारी रात्री उशीरा जारी केले आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी जयवंशी यांनी (ता.२९) मार्च सकाळी सात ते  (ता.४) एप्रिल सायंकाळी बारा पर्यंत सात दिवसाची संचारबंदी लागू केली आहे. या कालावधीत दूध विक्री केंद्र व दूध विक्रेते यांना सकाळी सात ते दहा या वेळेत घरपोच सेवा उपलब्ध करून देण्याची परवानगी असेल. संचारबंदी काळात शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँकचे कामकाज सुरु राहणार आहे. यासाठी संबंधित अधिकारी, कार्यालयाना येजा करण्यासाठी मुभा देण्यात येईल. परंतु सोबत ओळख पत्र ठेवणे बंधनकारक असेल, तसेच शाळा, महाविद्यालय, धार्मिक स्थळे, लान्स बंद राहतील. केवळ औषधी दुकाने सुरु राहणार आहेत. 

जिल्ह्यातील महामार्गाची कामे सुरु राहतील. तसेच आरोग्य सेवा, पाणीपुरवठ्याची कामे विदुयत विषयक कामांना परवानगी असेल. याशिवाय वाळू घाटातील उत्खनन करणे, स्वछता विषयक कामे करता येतील. मात्र ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक राहील. अत्यावश्यक सेवा व शासकीय वाहनांसाठी तसेच कृषी विषयक कामासाठी पेट्रोल पंप सुरु राहतील. या काळात जिल्ह्यातील बससेवा  वाहतुकीसाठी पूर्ण पणे बंद राहणार आहे, मात्र बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या बसेसना बसस्थानकाशिवाय कुठेही थांबण्याची परवानगी नाही. सदर कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या लग्न सोहळ्याना परवानगी असेल. सेवा देणाऱ्या नागरिकांना मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com