esakal | हिंगोलीच्या बाजारपेठेत खरेदीसाठी उडाली झुंबड; उद्यापासून सात दिवसांची संचारबंदी
sakal

बोलून बातमी शोधा

A seven-day curfew has been imposed in Hingoli district from tomorrow.jpg

नेहमी रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने बाजारात बहुतांश दुकाने बंद असतात. मात्र आज सर्व दुकाने सुरू होती.

हिंगोलीच्या बाजारपेठेत खरेदीसाठी उडाली झुंबड; उद्यापासून सात दिवसांची संचारबंदी

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेत जिल्हाधिकारी यांनी सात दिवसाच्या संचारबंदीचे आदेश काढल्याने रविवारी (ता.२८) बाजारात जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती.

जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सोमवारपासून (ता. एक) ते सात मार्च असे सात दिवस संपूर्ण संचारबंदी लागू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी बाजारात जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. यात किराणा सामन खरेदीसाठी शहरातील सर्वच दुकानावर गर्दी होती. तसेच भाजीपाला खरेदीसाठी देखील भाजी मंडईत गर्दी झाली होती. शहरातील विविध पेट्रोल पंपावर पेट्रोल घेण्यासाठी दुचाकी धारकांच्या रांगा लागल्या होत्या.

नेहमी रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने बाजारात बहुतांश दुकाने बंद असतात. मात्र आज सर्व दुकाने सुरू होती. संचारबंदीत ही दुकाने बंद राहणार आहेत. दरम्यान, सात दिवसाच्या संचारबंदीला अनेकांनी विरोध केला आहे. वंचित बहुजन आघाडीतर्फे निषेधाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. 

या निवेदनावर जिल्हाध्यक्ष सुरेश धोतरे, जिल्हा महासचिव रविंद्र वाढे, जिल्हा सचिव रणवीर, जिल्हा प्रवक्ते रूपेश कदम, उपाध्यक्ष अनिल हनवते आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. तर सेनगावात देखील सोशल मिडीयावर संचारबंदीचा निर्णय मागे घ्यावा, अशी चर्चा होत आहे.

loading image