सत्तर शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या, अठ्ठावीस कुटुंबियांना मिळेना आर्थिक लाभ

1crime1_7
1crime1_7

उमरगा : निसर्गाच्या बदलत्या चक्रामुळे नापिकी त्यात कर्जाच्या ओझ्यामुळे जीवन असहाय झाल्याने गेल्या आठ वर्षाच्या कालावधीत सत्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या माडज गावातील आहेत. दरम्यान  सत्तरपैकी ४२ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना शासनाकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा लाभ मिळाला, तर २८ शेतकरी निकषास प्राप्त ठरले नसल्याने शासनाच्या आर्थिक मदतीचा लाभ मिळू शकला नाही.


उमरगा तालुक्यात २०१२ ते २०१७ या वर्षात ३९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. त्यानंतरच्या अडीच वर्षात ३१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र पाहता कोरडवाहू शेतीचे क्षेत्र सर्वाधिक आहे. बारमाही पाण्याची उपलब्धता असलेले क्षेत्र कमी होत चालले आहे. शेतकरी कुटुंबाची उपजीविका शेतीवरच अवलंबून आहे.

शेतीत मोठ्या मेहनतीने शेतकरी काम करतात. पण वेळेत पाऊस झाला तरच शेतकऱ्यांच्या हाती उत्पन्न येते. राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जातो. मात्र श्वाशत शेतीसाठीच्या प्रभावी उपाययोजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत. सातत्याने तालुक्यात आत्मत्येचे सत्र सुरू असल्याने यामागचे नेमके कारण कर्जबाजारी, नापिकी असल्याचे समोर येत आहे. दरम्यान माडज येथे सर्वाधिक दहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

नाईचाकूर, बलसूर, तलमोड, कंटेकुर, बोरी, कराळी, मुरूम, जकेकुर, नारंगवाडी, जकेकुरवाडी, हिप्परगाराव, दाळींब, फुलसिंगनगर, मानेगोपाळ, कवठा, भगतवाडी, तुगांव, सावळसुर, मातोळा, मळगीवाडी, चंडकाळ, पारसखेडा, कलदेवलिंबाळा, समुद्राळ,येणेगुर, डिग्गी, मुळज, तुरोरी, कडदोरा, चिंचकोट, एकोंडी (जहागीर), चिंचोली (भूयार), रामपूर, सुपतगांव या गावातील शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

छत्रपती उदयनराजेंनीच नेतृत्व करावे, मराठा आरक्षणासाठी विनायक मेटेंनी केले आवाहन

शासन, प्रशासनाकडून मदतीचा हात
सत्तरपैकी २८ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना निकषपात्र नसल्याने आर्थिक मदत मिळू शकली नाही. आर्थिक मदतीशिवाय सर्वच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना विविध शासकीय योजनेचा लाभ देण्यासाठी प्रशासकीय स्तरावरून प्रयत्न झाले आहेत. शिवाय नोव्हेंबर २०१८ मध्ये तत्कालीन विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या गृहभेटीचा उपक्रम सुरू केला होता.

त्यात वैयक्तिक माहिती, मृत्यूपूर्वीची आरोग्यस्थिती, वार्षिक उपन्न, आत्महत्येचे कारण, शेतजमीन विषयक व कर्ज प्रकाराची माहिती, कर्जमाफी मिळाली का? बँकेने कर्जास नकार दिला असल्यास त्याचा तपशील, पशुधन विषयक माहिती, उत्पन्नाचे स्रोत आदी बाबींच्या माहितीचा तपशील विहित नमुन्यातील कागदपत्रावर घेण्यात आले होते. त्यानुसार झालेल्या सर्वेत अनेक कुटुंबाना लाभ मिळू शकला.



" शेतकरी आत्महत्या ही दुर्देवी बाब आहे. त्यांच्या वारसांना विविध शासकीय योजनांचा लाभ दिला जातोय. अंत्योदय, शेतकरी, अन्नसुरक्षा या योजनांतून ६५ कुटुंबियांना लाभ दिला आहे. विशेष आर्थिक साहाय्य योजनेत यापूर्वी अनेकांना लाभ दिला आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने सहा शेतकरी वारसांना लाभ दिला जाणार आहे. कृषी विभागाने तेरा कुटुंबियांना शेतकरी गटात सामावून घेऊन विविध योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न केला आहे.

- संजय पवार, तहसीलदार


संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com