Water Scarcity in Aadul Region
sakal
आडूळ - पैठण तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील आडूळ बु. व परिसरात एप्रिल महिन्याच्या अखेरीसच पाणी टंचाईने तीव्र रूप धारण केले असून मे महिन्यात परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी येथील महिला, वृद्ध आणि लहान मुलांना दररोज हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. आडूळ तांडा, खडकी तांडा, जामवाडी तांडा व शिवगड तांडा या भागांत टंचाईचे सर्वाधिक चटके जाणवत आहेत.
Water Scarcity in Aadul Region
sakal