

Jalna News
esakal
धाकलगाव: शहापूर ते बारसवाडा या मुख्य रस्त्याची खड्ड्यांमुळे मोठी दुरवस्था झाली आहे. त्यामुळे ‘सकाळ’ने यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले होते. दरम्यान, सदरील वृत्ताची दखल घेऊन शहापूर ते बारसवाडा या मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरवात करण्यात आली आहे.