गेवराई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने मंगळवार आज (ता. १३) जाहीर झाला असून, बीडच्या गेवराईतील शारदा विद्या मंदिराने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवल्याने यंदा तर १८८ विद्यार्थ्यांपैकी तब्बल १०० विद्यार्थ्यांनी ९० टक्के यापेक्षा आधिक गुण घेतल्याने अव्वल ठरली आहे.