
अंबाजोगाई : शेगाव येथून पंढरपूरला पांडुरंगाच्या भेटीला निघालेल्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे शनिवारी (ता. २१) दुपारी अंबानगरीत उत्साहात आगमन झाले. विठूनामाचे अभंग व ‘गण गण गणात बोते’च्या जयघोषात आणि टाळ-मृदंगाच्या गजरात शहर परिसर दुमदुमला होता.