Sheikh Jilani : वैगुण्यावर मात करून शेख ठरले दिव्यांगांचा आधार; दोन वर्षांचे असताना पोलिओमुळे आले अपंगत्व; संघर्षातून समाजसेवेत पाडली छाप
Beed News : दोन वर्षांपूर्वी पोलिओमुळे अपंग झालेल्या शेख जिलानी बशीर यांनी दिव्यांगांसाठी समाजसेवेचे मोलाचे कार्य केले आहे. गेल्या दीड दशकांपासून त्यांनी दिव्यांगांच्या हक्कांसाठी सतत संघर्ष केला आहे.
पाटोदा : दोन वर्ष वय असतानाच पोलीओ सारखा आजार वाट्याला आला. आयुष्यात खऱ्या अर्थाने स्वतः पाऊल टाकायची वेळ असताना दोन्ही पायातील त्राणच गेला व नशिबी कायमच अपंगत्व आले. दुसऱ्याच्या आधारावरच आयुष्यात उभा राहावं लागणार हे स्पष्ट झाले.