

Shendurwada News Two Buffaloes Die After Contact With Low Hanging Electric Wire Farmer Seeks Action and Compensation
esakal
-नानासाहेब जंजाळे
शेंदूरवादा : गंगापूर तालुक्यातील शेंदूरवादा येथे महावितरणाच्या धोकादायक वीजवाहिनीमुळे विद्युत प्रवाहाचा धक्का लागून दोन म्हशींचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. ११) दुपारच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत गोपालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, दुष्काळी परिस्थितीत त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. महावितरणाच्या कारभारावर यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.