MLA Prashant Bamb
sakal
शेंदूरवादा - दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच आर्थिक मदत मिळावी, यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत. जनावरांसाठी आवश्यकतेनुसार चारा छावण्या सुरू करून पिण्याच्या पाण्याचेही नियोजन करण्यात येईल. शेतकरी जनता दुष्काळाच्या संकटात असताना विरोधकांनी विनाकारण राजकारण करू नये, असे प्रतिपादन आमदार प्रशांत बंब यांनी मंगळवारी (ता. २९) केले.