Kannad News : शिरोडीच्या सुहास इंगळेचे ‘एमबीबीएस’ परीक्षेत यश; ग्रामस्थांच्या वतीने ढोल-ताशांच्या गजरात भव्य नागरी सत्कार

शेतकरी कुटुंबातील सुहास इंगळे यांनी वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाची आणि कठीण मानली जाणारी 'एमबीबीएस'ची अंतिम परीक्षा उत्तीर्ण करून घवघवीत यश संपादन केले.
Suhas Ingale

Suhas Ingale

sakal

Updated on

​कन्नड - तालुक्यातील शिरोडी येथील शेतकरी कुटुंबातील सुहास राजेंद्र इंगळे यांनी वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाची आणि कठीण मानली जाणारी 'एमबीबीएस' ची अंतिम परीक्षा उत्तीर्ण करून घवघवीत यश संपादन केले आहे. गावातील एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलाने वैद्यकीय क्षेत्रात मारलेली ही गरुडझेप संपूर्ण शिरोडी गावासह तालुक्यासाठी भूषणावह ठरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com