E-Peek Survey: दुष्काळाच्या संकटात 'ई-पीक'ची डोकेदुखी;शिरूर कासारमध्ये कचाट्यात शेतकरी; ९६ हजार गटांची नोंदणी रखडली, ओटीपी येईना

Shirur Kasar E-Peek Survey, Farmer Compensation, Technical Issues. शिरूर कासार तालुक्यात ई-पीक पाहणी प्रक्रियेत तांत्रिक अडचणी येत असल्याची माहिती आहे. १ लाख ८४ हजार ११९ गटांपैकी २३ सप्टेंबरपर्यंत ८७ हजार १६४ गटांची पाहणी पूर्ण झाली असून ९६ हजार ९५५ गटांची नोंदणी बाकी आहे.
Farmers face technical difficulties during the e-Peek crop survey in Shirur Kasar.

Farmers face technical difficulties during the e-Peek crop survey in Shirur Kasar.

esakal

Updated on: 

शिरूर: पाऊस नसल्याने आधीच शेतातलं पीक करपून गेलंय. उद्या काही नुकसानभरपाई मिळावी म्हणून ई-पीक पाहणी करायला गेलो, तर मोबाइलवर ओटीपीच येत नाही. आणि शासनाने जे सहाय्यक नेमलेत, ते गटामागे १००-२०० रुपये हातावर ठेवल्याशिवाय शेताच्या बांधावर यायलाच तयार नाहीत. निसर्गाने मारलंय, आता हे पैसे आणायचे तरी कुठून? हा उद्वेग आहे शिरूर कासार तालुक्यातील एका हतबल शेतकऱ्याचा.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com